Jalgaon मानियार बिरादरी तर्फे गौरव
Today we have a news topic about Jalgaon मानियार बिरादरी तर्फे गौरव. जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे जळगाव जिल्ह्यातून उर्दू माध्यमासाठी पत्रकारिता करणारे तसेच उर्दू माध्यमातून न्यूज चैनल चालविणारे १६ माध्यम प्रतिनिधी चा सत्कार सोहळा पार पडला यात काही पत्रकारांचा सत्कार ईद-ए-मिलादुन्नबी च्या दिवशी करण्यात आला होता तर बाकी पत्रकारांचा सत्कार गुरुवारी एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विजय रामदास पाटील हे होते.
*उर्दू पत्रकाराचे मनोगत*
मिठा करेला न्युज चॅनेल चे मुश्ताक करिमी यांनी उर्दू माध्यमातील पत्रकार यांनी पाहिजे तसे परिश्रम करण्याची आवश्यकता असून बातमी ऐवजी लेख लिहून समाज सुधार करण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रदर्शित केले. उर्दुटाइम्स मुंबईचे पत्रकार सईद पटेल यांनी चांगला समाज घडविण्यासाठी व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रशिक्षण व प्रशिक्षित पत्रकारांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
मुंबई उर्दू न्यूज चे वार्ताहर साजिद मिर्झा
मुंबई उर्दू न्यूज चे वार्ताहर साजिद मिर्झा यांनी संस्कृती व संस्कार यावर भर देण्यावर लक्ष केंद्रित केले. वायरल न्यूज चे हाफिज रहीम यांनी सर्वसामान्य माणसांना व खास करून महिला व तरुण मुलींसाठी वेगवेगळ्या छोट्या पडद्यावर द्वारे त्यांना नवयुगा ची ओळख करून देण्यावर भर दिला. इन्कलाब मुंबईचे चाळीसगाव येथील शर्जील कुरेशी यांनी पत्रकारितेसाठी आपणास कोणाच्या वर ही विसंबून राहता कामा नये व सर्व कृती आवश्यक असल्याचे मत प्रदर्शित केले.
एशियन टाइम्स चे झुल्फिकार सैयद यांनी पत्रकारिता, सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील शर्यतीत आमचा सहभाग असावा व त्या द्वारे शिक्षित होण्यावर भर दिला. नदवी टाइम्स व व्हायरल न्यूजचे संपादक मुफ्ती हारुन यांनी या जगाला शिकण्याचे आदेश देणारे जगद्गुरु यांनी पत्रकारितेचे महत्व आपल्या पवित्र कुराणा द्वारे मानवजातीला समजून दिलेले आहे त्यावर प्रत्यक्ष भर देण्याची गरज असल्याचे मत प्रदर्शित केले.
*पत्रकारितेला भाषा- जात धर्म – नसतो विजय पाटील*
पत्रकारिता या क्षेत्रात जात धर्म भाषा याला स्थान नसून पत्रकारिता ची ओळख आपण लोकशाहीचे चौथे खांब असून आपण या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी काय करीत आहात हे जर समजले तर त्याला खरी पत्रकारिता समजली व त्याने त्याचा अवलंब केले तर त्याने समाजाला व देशाला एक दिशा दिली असे मानण्यास हरकत नसल्याचे मत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय बापू पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मतप्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी उर्दू माध्यमाच्या पत्रकारांसाठी लवकरच एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बिरादरी तर्फे करण्यात येणार व त्याद्वारे ज्येष्ठांचे मार्गदर्शन तरुणांचे अनुभव येणाऱ्या पिढीला पत्रकारितेचे महत्व विशद करण्यासाठी सदरची कार्यशाळा आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानियार बिरादरीचे एडवोकेट अमीर शेख यांनी केले तर आभार बिरादरीचे सचिव अब्दुल रउफअब्दुल रहीम यांनी मानले.
*गौरव मूर्ती उर्दू पत्रकार*
मुफ्ती हारून नदवी (वायरल न्यूज व नदवी टाइम्स )
अली अंजुम रिझवी (फ्रीलान्स रिपोर्टर )
मुश्ताक करिमी (मीठा करेला)
सईद पटेल (उर्दू टाइम्स मुंबई)
अकिल ब्यावली( फ्रीलान्स पत्रकार)
साजिद मिर्झा (मुंबई उर्दू न्यूज )
शरजिल कुरेशी (इन्कलाब मुंबई)
एजाज खान( आय आय एन न्यूज)
आसिफ शेख (झी सलाम)
झय्यान अहमद (औरंगाबाद टाइम्स)
कामिल शेख, जुल्फिकार सय्यद व सलाउद्दीन आदीब, (सर्व एशियन एक्सप्रेस औरंगाबाद)
हाफिज शफिक (रहमानी पोर्टल)
रिजवान फलाई व हाफिज रहीम (वायरल न्यूज)
फोटो कॅपशन
गौरवानकीत उर्दू पत्रकार सोबत विजय पाटील, फारूक शेख,अडव्होकेट आमिर शेख,अब्दुल राऊफ व नबी शेख दिसत आहे.
You can browse following links for more information.
- You must improve
your real estate knowledge. - Visit our youtube channel now !
- https://adforproperty.com/owner/
Hope you enjoyed. Thank you very much for the visit.
