त्रिपुरा येथील हल्ल्याचा निषेध तसेच त्रिपुरा व चीन येथील मशिदी ला सुरक्षा कवच बाबत निवेदन
जळगाव शहरातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे मुस्लिम समाजातिल महिला व पुरुषांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमाने माननीय राष्ट्रपती जी, पंतप्रधान व गृहमंत्री यांना त्रिपुरा येथे अल्पसंख्यांक व धार्मिक स्थळावर झालेल्या व होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून सदरचे हल्ले त्वरित थांबवण्यात यावे व हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
चायना एम्बेसी ला सुद्धा निवेदन
चायना येथील राष्ट्राध्यक्ष यांनी चीनमधील मशिदीचे चे घुमट व मिनार पाडण्याचे आदेश दिले असून त्याप्रमाणे कारवाई होत आहे ते त्वरित थांबविण्यात यावे, चीन मधील हुई मुस्लिम जे तेराशे वर्षापासून वास्तव्यास आहे त्यांचे रक्षण करण्यात यावे, मुस्लिम हुई घरांवर होत असलेला अन्याय व अत्याचार त्वरीत थांबवावा व चीनने मागील दोन वर्षात अनेक मुस्लिम धार्मिक संस्था बंद करून ही इमामांना अटक केली आहे त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव मार्फत एमबीसी ऑफ पीपलस रिपब्लिक ऑफ चायना द्वारा शांति पथ, चाणक्यपुरी, दिल्ली यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन न्यूयार्क, अमेरीका व ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक ऑपरेशन, सौदी अरब यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहे.
दोन्ही निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांना सादर
दोन्ही वेगवेगळे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी महाजन यांना सय्यद चांद व फिरोझा शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या व उपस्थिती
मानियार बिरादरीचे फारुक शेख, राष्ट्रवादीचे फिरोज शेख, शिकलगार बिरादरीचे अन्वर शिकलगर व अझीझ सिकलगर, फुले मार्केट असो चे फारूक अहेलेकार, सत्य प्रचार चे वसीम खान, जामा मसजीद ट्रस्टचे सय्यद चांद, जमात ए इस्लामी चे मुस्ताक मिर्झा, समाजवादी पार्टीचे शेख मोहिनुद्दीन इक्बाल व अझीझ खान, एम आय एम चे महानगराध्यक्ष दानिश सय्यद ,उर्दू पत्रकार शेख कामिल व कैफ खान, जळगाव जिल्हा मुस्लीम सेवा संघाच्या अध्यक्ष श्रीमती फिरोजा शेख, महासचिव एडवोकेट कु. नसरून फातेमा पिरजादे, संचालिका सौ राणी शेख , श्रीमती रहेमत उस्मान पटेल , मुस्तफाखान, महबूब शेख, दिव्यांग संघटनेचे मुजाहिद खान, शिवाजीनगर मित्र मंडळ चे तोफिक पटेल आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
1. जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करताना
2. अप्पर जिल्हाधिकारी महाजन साहेब यांना निवेदन देताना फिरोझा शेख/ सय्यद चांद सोबत फारुक शेख एडवोकेट नसरुल पिरजादे, फारूक अहेलेकार ,फिरोज शेख, अन्वर खान,सय्यद दानिश आदि दिसत आहे.
You can browse following links for more information.
- You must improve
your real estate knowledge. - Visit our youtube channel now !
- https://adforproperty.com/owner/
Hope you enjoyed. Thank you very much for the visit.